आमचं नशीब, आम्ही दुसऱ्या कोणाच्या प्रभावाखाली येण्याआधी आम्हाला पवार सर भेटले!
नृत्य आणि गाणं या दोन कला सोडल्या तर आपल्याकडे गुरुकुल पद्धतीप्रमाणे शिष्याला प्रत्यक्ष हात धरून शिकवणं संपलेलं आहे. याच परंपरेचा अखेरचा शिलेदार म्हणता येईल अशा पवार सरांचा सहवास आम्हाला मिळाला ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि हा सहवास लौकिक अर्थानं गुरुशिष्यांचा संबंध कॉलेजपुरता न राहता त्यांच्या पहिल्या भेटीपासून आजतागायत व्यापून राहिला आहे.......